Blog

पत्नी आली कामावरुन

पत्नी आली कामावरुन
लोकलचा प्रवास करून
दमून भागून आलेली
दिसत होती थकलेली

आली तशी लगेचंच
स्वयंपाक घरात शिरली
हात पाय धुताच
कामाला लागली

रव्याची पिशवी उघडली
पातेलीत ओतली….
सॉरी सॉरी सॉरी,
युग संपलं पातेलीचं
सुरु झालं बाउलचं

बाऊल मध्ये रवा ओतला
हातून बाऊल निसटला
रवा सगळा सांडून गेला

थकल्या हातांना बाऊल
धरवेना
थकलेले डोळे उघडे राहीना
अवस्था ही तीची मला
पाहवेना

घेतला निर्णय मनाशी
धावत गेलो वार्यावर
गोडबोलेचं दुकान कोपर्यावर
दोन पाकीटं घेतली
धनश्रीच्या सांज्याची

बाऊल मध्ये पाकिट ओतलं
वरुन उकळतं पाणी घातलं
दोन मिनीटात सांजा तयार
मनोमन मानले धनश्रीचे आभार

खमंग फोडणीचा सुवास दरवळला
सौभाग्यवतीचा डोळा उघडला
नजर कृतार्थ झाली
थकावट विरघळली
जीवन सार्थक झाल्याची
जाणीव मात्र झाली

सोनियाचा दिवस जणू
धनश्री, किती आभार मानू
हेच हवे मम मनोमनी
धनश्री महत्वाची जीवनी

– वसंत दांडेकर