मला खरं तर वेगळ्याच लाटां बद्दल सांगायचे आहे. त्या आहेत खाण्याच्या लाटा… थोडा वेगळा प्रकार… तसे कान डोळे उघडे ठेवले की आजूबाजूला याबद्दल नेहमी ऐकू येत असते, पण माझ्या मैत्रिणी मुळे मी जवळून अनुभवले.
बरं याची सुरुवात कुठून होते तर वजन कमी करणे (सगळ्यात मुख्य goal), zero figure, सुदृढ हृदय, उजळ कांती, इ. इ. प्रत्येकवेळी वेगळी कारणे आणि वेगळी खाण्याची लाट…
मला आठवतंय साधारण १४/१५ वर्षापूर्वी मैत्रिणीने सर्वात प्रथम डाएट कोर्स केला… त्यावेळेस त्याची लाट होती… त्यांनी दिलेल्या प्लॅन प्रमाणे रोज तेवढा एकच पदार्थ खायचा. तिने कोर्स पूर्ण केला आणि मग काय इतका अशक्तपणा आला की विचारूच नका… असेच काही महिने सुरळीत गेले अन् म्हणाली आता High Fiber Diet (अजून एक लाट) मग कोंड्याचे पदार्थ करून खायला लागली… सुरवातीला वजन कमी झाले पण चेहऱ्याची रयाच गेली, तुकतुकी गेली की त्या fiber बरोबर…
नंतर केले Low Carb High Protein डाएट… मी तिला म्हणाले की जे एकाला उपयोगी पडेल तेच सगळ्यांना, असे होत नाही, तरी तिचे आपले सुरूच होते.
अशा अनेक लाटा आल्या खाण्याच्या, कधी सकाळी उठल्यावर त्रूणांकुर रस तर कधी दुधीचा रस. मग आली zero figure साठीची डाएट लाट (दिवेकर लाट)… खूप जणींनी follow करायचा प्रयत्न केला पण दर दोन तासांनी खाणे, तेही शक्यतो पारंपरिक, ते काही जमेना. यात (दिवेकर लाट) माझी मैत्रीण पण होतीच….
कोण करणार आणि office मधे वेळ कसा मिळणार खायला? तरीही तिने आणि अनेक जणी जसे जमेल तसे सुरूच ठेवले होते दिवेकर डाएट. कारण पारंपरिक खाण्यावर त्यांचा जास्त भर होता ना… या आणि अशा अनेक मधून च छोट्या मोठ्या लाटा येऊन गेल्या पण दिवेकर लाटे नंतर एक मोठी लाट आली ती दिक्षित डाएट. यात किती आणि काय खावे याला काहीच बंधन नव्हते पण दोनच वेळा खावे हे मात्र नक्की! काही जणींनी लगेच दिक्षित डाएट सुरू केले पण माझी मैत्रीण म्हणाली की मी आता नवीन काही नाही करणार… जे सुरू आहे तेच (दिवेकर डाएट) ठेवणार… मीच hushhh केले… चला निदान पारंपरिक पदार्थांचे महत्त्व पटले असावे…
असे सगळे सुरू होते आणि ….
ध्यानी मनी नसताना करोना नामक वेगळीच लाट आली. यापासून बचाव करायचा तर immunity वाढवायला पाहिजे. यासाठी मग वेगवेगळे उपाय सांगितले गेले… आयुर्वेदिक काढा, गरम वाफ, प्राणायाम इ. आणि या बरोबरच महत्त्वाचे म्हणजे सात्विक, पौष्टिक, गरमागरम चौरस आहार, जो आपल्या आई, मावशी, आत्या, आजी करायच्या. सगळेजण हे नियम पाळू लागले त्यात साधे सोपे पारंपरिक पदार्थ पण आले …आणि भरीला lock down व WFH असेही सुरू झाले… त्यात माझी ही मैत्रीण नोकरीसाठी दुसरीकडे एकटी राहत होती ती तिकडेच अडकली… झाले लगेच तिचा फोन आला आता गं! कसे करू सांग ना… Solution दे? अशी तिची फर्माईश होती. कारण ऑफिस चे काम आणि lock down सांभाळून जेवणाचे हाल होत आहेत… डाएट तर होतच नाहीये…

मी तिला लगेच Ready to Cook आणि तरीही पारंपरिक असे माझ्या मामी चे “धनश्री फुड प्रॉडक्ट्स” घ्यायला सांगितले. कारण माझ्या मुलीनेही जॉब साठी बंगलोर ला असताना धनश्री चे प्रॉडक्ट्स वापरले होते तो अनुभव होतच ना माझ्याकडे.
मैत्रिणीने पण लगेच DFP ला ऑर्डर दिली. आठ दिवसांनी तिचा हसत आनंदाने फोन आला Thank You! What a relief & great solution! Now I am doing my office work with peaceful mind. आणि म्हणाली की, ‘मी पण माझ्या friends ना suggest केले धनश्री फूड प्रॉडक्ट्स!!
Sunita Vaidya is a freelance Maths Teacher, who coaches college students for competitive exams.
Her love for Marathi literature shines through in the many poems she writes. She combines this with a love of nature and music.
Her enthusiasm for teaching is seen by her students and follow teachers. She also volunteeres for a NGO, Bhagini Nivedita Pratishthan, Pune, where she teaches science to underprivileged students. Many of her poems are based on science concepts and are her creative way of making education fun for her students.
