Blog

‘ ती’ सध्या काय करते….

परवा TVवर  पिक्चर लागला होता….’ती सध्या काय करते’…तसा मलाही आवडतो तो पिक्चर. पण नवरोबाला जरा जास्तच😛.पिक्चर  बघताना मला उगाचच प्रश्न पडला…ती खरंच सध्या काय करत असेल बुआ🤔 (ह्यातली ‘ती’ मात्र ‘जनरल ‘ बरं का) तर सध्या..म्हणजे अगदी आत्ता हं… lockdown मध्ये…म्हणजे माझ्यासारखं WFH +WFH… work FROM home आणि work FOR  home पण का?

खरच या lockdown आणि कोरोना प्रकरणात कोरोना योद्धे बनले डॉक्टर,nurses,police वगैरे वगैरे…पण आजची working woman पण झालीच आहे की’करो ना’ योद्धा.म्हणजे घरचं काम पण ‘करो ना’आणि ऑफिस चं काम पण ‘करो ना’….पूर्वी कामासाठी बाहेर जात होतो तेव्हा निदान घरचं बटन switch ऑफ तरी करता यायचं…आता मात्र ते अखंड on… आणि आमची battery मात्र कायम reserve ला आलेली.सुरवातीला घराचं ‘घरपण’वगैरे वाटलेलं lockdown मात्र आता बहुतांश WFH बायकांची डोकेदुखी ठरायला लागलंय. ऑफिस चं आणि कूकर चं pressure काही कमी होत नाही आणि मंथली टार्गेट पूर्ण करताना तारेवरची कसरत होतीये ती वेगळीच.त्यातच मुलांच्या ऑनलाईन शाळा…. जणू पालकांना(आईला) lockdown म्हणजे लॉंग holiday आहे की काय असा वाटतंय बहुतेक या शाळांना….gadgetsच्या पसाऱ्यात मुलांचे प्रोजेक्ट…भरीस भर म्हणून नवनवीन टास्क काय… ऍक्टिव्हिटी काय… काही विचारू नका…त्यातून एकत्र कुटुंब असले तर सगळ्यांच्या तऱ्हा सांभाळताना आपला जॉबही सांभाळायचा😩हाय रे कोरोना!!!आणि हे सगळं करायचं ते ही maid शिवाय….आजकाल working woman साठी या maids म्हणजे खरोखर maid for each other असतात.आम्ही त्यांना आणि त्या आम्हाला सांभाळून घेत चालत असतो पुढे…पण त्या ही नाहीत lockdown मध्ये मदतीला…घरच्यांच्या खाण्यापिण्याच्या demand काही संपत नाहीत आणि आमचं बेसिनरूपी अक्षयपात्र कधी रिकामं होत नाही…

पण तरीही आज ती net -ane आणि रेटाने उभी आहे…तिच्या परीने work life balance सांभाळतीये…Rather आता खरं म्हटलं तर चांगलीच सरावलीये…म्हणतात ना practice makes wo’man’ perfect…गेल्या lockdown मध्ये जर गडबडलेली ती आता अगदी कॉर्पोरेट फंडे घरात शिताफीने वापरतेय…म्हणजे प्लांनिंग …त्यात priority ठरवणं…आणि त्याच excecution. म्हणजे थोडक्यात म्हणायचं तर टास्क define करून dedicate करणं… त्यात घरातल्यांना सहजपणे सामील करून घेणं…आहे की नाई कॉर्पोरेट management …. म्हणजे एकाच वेळी ऑफिसच्या टॉप excecutives बरोबर online meeting करायची… ओट्यावर लॅपटॉप ठेऊन भेंडीची भाजी पण फोडणीला घालायची…मीटिंगसाठी तयारी करायची ते अलगद भेंडीची ताट आणि सूरी आसुबाईंच्या समोर सरकावूनच …तेवढ्यात आपल्या लाडक्या लेकाला प्रोजेक्ट cutting पण तयार करायला सांगायचं…ते ही time लिमिट देऊन…थोडक्यात त्यांना पण बिचार्यांना corporate culture च बाळकडू मिळतंच आणि आपलाही वेळ वाचतो…या आणि अशा बऱ्याच गोष्टी…पण त्यामुळेच तर आज तिचा आणि घरातल्यांचाही स्ट्रेस कमी झालाय…हे सगळं करताना मला गम्मत म्हणून अष्टभुजा देवीचेच रूप मनात आले…आई लहानपणी ओरडायची… घे की जरा स्वतःचं स्वतः… मला काय चार हात आहेत का…पण आज मात्र तीच स्त्री अष्टभुजा होऊन खिंड लढवतीये…पण बघा हं… देवाला कधी एवढे हात नसतात पण देवी मात्र अष्टभुजा…म्हणजे gender discrimination किती जुनं आहे बघा….

विचारात असतानाच  टणकन बेल वाजली म्हणून भानावर आले.दार उघडून बघते तर दारात courier वाला ….‘धनश्री’ची रेडी टू कूक food packets घेऊन उभा. नवरा तेवढ्यात आला मागून आणि म्हणाला अग मीच मागवली आहेत….तुला उशीर होतो ना रोज सकाळी log in करायला cooking मूळे… त्यावर सोल्युशन….आणि पॅकेट्स घेऊन गेला पण आतमधे… मी मात्र गालातल्या गालात हसत होते…चला…म्हणजे लक्ष आहे की त्याचं… त्याची ‘ती’ सध्या काय करतीये याच्याकडे…

-दिप्ती

Dipti Vaidya-Athalye

A renowned dentist and a doting mother with many accomplishments to her credit. Her new found love for words is bringing the best out her in form of Poems, blogs and paintings. Dipti has been awarded as the the ‘Best Associate Dentist Award at the Fandent Excellence Awards in dentistry 2019. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *