
ऋचालाही राहून राहून वाटत होतं की आपण आईजवळ असायला हवं होतं. दोन्ही डोळ्यांचं मोतिबिंदूच ऑपरेशन म्हणजे कमीत कमी आठवडाभर तरी गॅस जवळ जाता येणार नाही….आणि बाबांनी कधी स्वतःचा चहा पण स्वतः करून प्यायला नाही…बाहेरून आणून तरी किती खाणार…आणि त्यांना तर बाहेरचं जेवण मुळीच पसंत नाही…त्यात आईचा डायबिटीस…
तर अस आहे सगळं…आयुष्यात पहिल्यांदा नवऱ्याच्या हातचं मस्त गरम गरम जेवतीये… पण ऋचा मला बाबांचं पण कौतुक वाटतं हं… कधीही त्यांनी स्वयंपाकघरात पाऊल ठेवल नव्हतं…पण आता वेळ पडल्यावर एक वेगळ्या दृष्टीने त्यांनी हे सगळं स्वीकारलं आणि निभावल सुद्धा…
-दिप्ती

A renowned dentist and a doting mother with many accomplishments to her credit. Her new found love for words is bringing the best out her in form of Poems, blogs and paintings. Dipti has been awarded as the the ‘Best Associate Dentist Award at the Fandent Excellence Awards in dentistry 2019.