Blog

धनश्री ची pre-mix आले मदतीला

खूप वर्षं घरी राहिल्यानंतर नोकरी निमित्त एकटी राहायला लागले होते. सुरुवात म्हणून होस्टेल वरच राहत होते एका. नाही म्हणायला खाण्या-पिण्याची सोय होती. पण होस्टेलची मेस ती, नाही म्हटलं तरी ६०-७० लोकांचा ३ वेळचा स्वयंपाक म्हटल्यावर क्वालिटीवर परिणाम व्हायचाच. मग कधी आठवड्यातून एकदा, मग दोनदा असं करत करत मी रात्रीचं जेवण बाहेरूनच मागवायला लागले होते. आधी मजा वाटली, पण एवढ्यावेळा बाहेरचं म्हणजे जरा चुकल्या चुकल्या सारखं वाटू लागलं; शिवाय तिथल्या किचनमध्ये ना काही करावंसं वाटायचं, ना ऑफिसनंतर काही स्वयंपाक करायची शक्ती उरायची.

तेव्हा ठरवलं धनश्रीच्या भाज्या मागवून बघुयात. पाणी घालून उकळल्या कि भाज्या तयार, आणि सोबत पोळी नाहीतर भात मेस मधून उचलायचा. आठवड्यातून २-३ जेवणं तर अगदी घरच्या सारखी व्हायला लागली! आणि अळूच्या भाजीत काजू असतात कळल्यावर तर मी अळूचं pre-mix खास ऑकेजनसाठी, आणि तसं काही नाही घडलं तरी सर्वात शेवटी संपवायला म्हणून ठेवून द्यायला लागले.

होस्टेल वरून flat वर शिफ्ट झाल्यावर नाश्ता पण मलाच माझा करायला लागायचा. मग काय! धनाश्रीचेच पोहे, उपमा, सांजा pre-mix आले मदतीला. सकाळच्या गडबडीत पटकन गरम गरम घरच्या सारखा नाश्ता तयार व्हायचा. आता मेसची पोळी किंवा भात नसले तरी तेवढे मागवायला नाहीतर ऑफिसच्या कॅफेटेरियातून घ्यायला सोय होती. अगदीच काही नाही तर मी नुसत्या भाज्या खायचे चमच्यानी. त्या तशाही छान लागतात!

आता नोकरी बदलली, सोबत आणि अजून वेगळ्या शहरात राहिला आले आहे. आता परत एकटं राहायचं म्हणजे परत तीच कथा. दुपारसाठी जेवणाचा डबा बनवून घेऊन जाते; आणि ऑफिसनंतर परत स्वयंपाक करायचा कंटाळा आणि आळस आल्यावरही घरच्या चवीचं खाऊ घालायला धनश्री आहेच!