धनश्री च्या ‘इन्स्टंट कांदे पोहे‘ जन्माची आठवण झाली….एका नाटकात अतुल परचुरेचे वाक्य आहे..” इन्स्टंट सगळे आहे रे इडली, डोसा, ढोकळा, पंजाबी आहे, आमचे कांदे पोहे आहेत का बोल?” खरंच खूप सिरीयसली घेतले. नुकतीच ‘रेडी टु कुक’..मध्ये शिरले होते ना! खूप R&D केले. आणि सरते शेवटी जमवले आणि जमले पण. सर्व प्रथम धनश्री ने बनवले. आता ट्रॕव्हल पॕकसुद्धा आहे. आता खूप ब्रँड आहेत पण, सर्व प्रथम बनवण्याचा सार्थ अभिमान आहेच.
भारती वैद्य .