
धनश्री च्या ‘इन्स्टंट कांदे पोहे‘ जन्माची आठवण झाली….एका नाटकात अतुल परचुरेचे वाक्य आहे..” इन्स्टंट सगळे आहे रे इडली, डोसा, ढोकळा, पंजाबी आहे, आमचे कांदे पोहे आहेत का बोल?” खरंच खूप सिरीयसली घेतले. नुकतीच ‘रेडी टु कुक’..मध्ये शिरले होते ना! खूप R&D केले. आणि सरते शेवटी जमवले आणि जमले पण. सर्व प्रथम धनश्री ने बनवले. आता ट्रॕव्हल पॕकसुद्धा आहे. आता खूप ब्रँड आहेत पण, सर्व प्रथम बनवण्याचा सार्थ अभिमान आहेच.
भारती वैद्य .
पोहे दिवस आहे आज. खरंच पोहे खर्या अर्थाने गृहिणींचा स्वयंपाक घरातील सहकारी. अडिनडीला विविध प्रकारे भूक भागवणार हमखास. किती प्रकार त्यांचे वर्णावे! आज आपल्याला काही माहीत असलेले काही नव्याने कळले. मला आज एक्झिबिशन मध्ये पहिल्यांदा इन्स्टंट कांदे पोहे बघितल्यावर आलेले आश्चर्योद्गार व कॉमेंट्स आठवल्या …”अय्या कमाल आहे ना?”, खरंच किती छान गं…इ.इ.इ.
“ए, आपण आपल्या लेकाला पाठवुया ना अमेरिकेत .कित्ती आठवण काढतो तो पोह्यांची. नक्कीच खुश होईल.”…..
बाहेर हमखास मिळणारा नाश्ता. आणि परदेशात हमखास आठवणारा पदार्थ म्हणजे..”पोहे” ….
